अपघाती मृत्यूने पालघर शहरात घाबराट

अपघाती मृत्यूने पालघर शहरात घाबराट
Published on

१५ दिवसांत चौघांचा मृत्यू
पालघर शहरात अपघातांची मालिका
पालघर, ता. २० ः शहरात गेल्या १०-१५ दिवसांपासून अपघाती मृत्यूंची मालिका सुरूच आहे. या अपघातामध्ये चौघांना जीव गमवावा लागला आहे.
पालघर नवली रेल्वे उड्डाणपुलावरील अपघातात नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवार पूनम यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापाठोपाठ सुप्रसिद्ध छायाचित्रकार राहुल दवेंचा पालघर बोईसर रस्त्यावर दुचाकीवर जात असताना अपघाती मृत्यू झाला होता. याच दिवशी केळवे भागातील अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. या घटनांनंतर शनिवारी पालघर शहरातील पूर्वेकडे असलेल्या सेंट जॉन कॉलेज जवळ टेम्पो, दुचाकीच्या धडकेत टेंभोडे नेस्ट येथे राहणारे अमोल नार्वेकर यांचा मृत्यू झाला, तर रविवारी पालघर शहरातील आंबेडकर चौक परिसरात एसटी, दुचाकी अपघातात टेंभोडे येथील खोजा कॉलनीमध्ये राहणाऱ्या अरमान मलिकचा (वय २२) मृत्यू झाला आहे.
------------------------------------
वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली
१२, १५ दिवसांमध्ये चार ते पाच जणांचा अपघाती मृत्यू झाल्याने पालघरमध्ये घबराट पसरली आहे. वाहतूक नियमांचे पायमल्ली, भरधाव वेगाने दुचाकी चालवणे, विनाहेल्मेट प्रवास आदी नियमांसह वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे आरोप होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com