

रोहिदास मुंडे यांची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
डोंबिवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कल्याण लोकसभा क्षेत्रात संघटनात्मक बांधणीला वेग देत महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांच्या सूचनेनुसार रोहिदास बामा मुंडे यांची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संघटनात्मक कामकाजाला नवचैतन्य मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मुंडे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नियुक्तीनंतर मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानत दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.