

नितेश राणेंविरुद्ध पुन्हा जामीनपात्र वॉरंट
संजय राऊत मानहानी प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल न्यायदंडाधिकाऱ्यांनी भाजप नेते नितेश राणेंच्या विरुद्ध नुकतेच पुन्हा एकदा जामीनपात्र वॉरंट काढले. याआधीही राणेंविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे.
मानहानीप्रकरणी नितेश राणेंचा जबाब नोंदवायचा असून, त्यांनी न्यायालयात उपस्थित राहून जबाब नोंदवणे आवश्यक आहे. परंतु ते वारंवार अनुपस्थित राहत आहेत. त्यांच्याविरुद्ध दोन वेळा जामीनपात्र वॉरंट, तर एकदा अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. हे प्रकरण खासदाराशी आणि आमदाराशी संबंधित आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने होणे आवश्यक असल्याचा युक्तिवादही राऊत यांच्याकडून सुनावणीवेळी करण्यात आला.
----
पुढील सुनावणीला उपस्थित राहणार
राणेंच्या वतीने त्यांचे वकील न्यायालयात उपस्थित राहत असले तरी त्यांचा जबाब नोंदवायचा असल्यामुळे राणे यांनी स्वतः सुनावणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नितेश यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढले. पुढील सुनावणी १० जूनला असून, त्या दिवशी राणे न्यायालयात उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
---
प्रकरण काय?
तीन वर्षांपूर्वी राणे यांनी राऊत यांना साप म्हणून संबोधले होते. राऊत हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून त्याच वर्षी जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असाही आरोप केला होता. त्यानंतर राऊत यांनी राणेंविरुद्ध मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली होती आणि बदनामीप्रकरणी कारवाईची मागणी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.