बेकायदा गॅस सिलिंडरच्या साठ्यावर कारवाई

बेकायदा गॅस सिलिंडरच्या साठ्यावर कारवाई
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरवर निर्बंध लादण्यात आले. याच पार्श्वभूमीवर ठाणे परिमंडळ विभागाने भरारी पथकाने छापा टाकून कासारवडवली परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा गॅस सिलिंडर साठवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. सोमवारी (ता. २०) केलेल्या कारवाईत ८८ हजारांचे १७ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेऊन कासारवडवली पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आखाती देशातील युद्धामुळे भारतामध्ये इंधन पुरवठा साखळी विस्कळित होऊन गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला. याचा सर्वाधिक फटका व्यावसायिक गॅस सिलिंडरधारकांना बसला. सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे अनेक व्यावसायिकांवर व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली. तर बेकायदा सिलिंडरचा साठा करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. अशातच उपनियंत्रक शिधावाटप, ठाणे परिमंडळ कार्यालयाचे प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिधावाटप अधिकारी सुभाष डुंबरे (कार्यालय क्र. ४१), महेश कुसमुडे, भगवान खंडेराव, मनीष शास्त्री, गणेश हरणे, भूषण देशपांडे, नीलेश देसाई आणि धीरज शिंदे आदींनी कारवाई केली.

भरारी पथकाने कासारवडवली येथील गौरव स्वीट ॲण्ड नमकीन या दुकानात धाड टाकली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गॅस साठा बेकायदा ठेवल्याचा आढळून आला. या छाप्यामध्ये एचपीसीएल कंपनीचे ४७.५ किलोचे पाच भरलेले आणि एक रिकामा सिलिंडर तसेच बीपीसीएल कंपनीचा १९ किलो वजनाचा एक भरलेला आणि १० रिकामे सिलिंडर असे एकूण १७ सिलिंडर जप्त केल्याची माहिती शिधावाटप कार्यालयाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com