

शासकीय कर्मचारी, शिक्षक बेमुदत संपवार
कार्यालयांमध्ये शुकशुकाट; कामे रखडली
अलिबाग, ता. २२ (वार्ताहर) ः राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवार (ता. २२)पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिकांसह जिल्हाभरातील सर्वच सरकारी कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले आहे. जिल्हा रुग्णालयातही परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्व मदार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर असल्याचे पहायला मिळाले.
सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत स्पष्ट नियम जाहीर करणे, १ मार्च २०२४पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्ती वेतन देणे, चतुर्थश्रेणी आणि वाहनचालकांच्या भरतीवरील बंदी उठवणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करणे, रिक्त पदे भरणे अशा विविध मागण्या कर्मचाऱ्यांच्या गेले वर्षानुवर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी गेल्या वर्षभरात विविध कर्मचारी संघटनांनी सात वेळा आंदोलन केली. परंतु, सरकारने सातत्याने याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे कर्मचारी संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यसर्व संघटनांच्या वतीने राज्यभरात हा संप पुकारण्यात आला आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात तसेच तालुकास्तरावर मंगळवारी (ता. २१) सकाळपासून सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे.
कार्यालयात शुकशुकाट, कामे रखडली
या संपामुळे जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिकांसह जिल्हाभरातील सर्वच सरकारी कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांची कामेही रखडली असून अनेकांना काम न झाल्याने परतावे लागत आहे. सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट असल्याचे पहायला मिळत आहे.
जिल्हा रुग्णालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांवर मदार
जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात सहभागी झाल्याने आरोग्य सेवा खंडित होउ नये यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ओपीडी, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग प्रसुती कक्ष सुरू ठेवण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. शितल जोशी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.