

पनवेल, ता. २३ (वार्ताहर) : जुन्या पनवेलकडून नवीन पनवेलकडे जाणाऱ्या एका भाजीविक्रेत्याला तिघा लुटारूंनी चाकूचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील एक लाख ७० हजारांची सोन्याची चेन लुटून पलायन केल्याची घटना बुधवारी (ता. २२) दुपारी रेल्वे क्रॉसिंग पुलाखालील बोगद्यात घडली. याप्रकरणी पनवेल शहर ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
संतोष रामलाल गुप्ता (वय ४५) हे नवीन पनवेल येथे राहण्यास असून ते भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ते मोटारसायकलवरून जुन्या पनवेलकडून नवीन पनवेल येथील घरी जात होते. या वेळी ते रेल्वे क्रॉसिंग पुलाखालील बोगद्यात आले असताना, एका मोटारसायकलवरून आलेल्या तिघा लुटारूंनी गुप्ता यांची गाडी अडवली. त्यानंतर लुटारूंनी गुप्ता यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅमची सोन्याची चेन जबरदस्तीने लुटली. लुटारूंसोबत झालेल्या झटापटीत गुप्ता यांच्या मानेला दुखापत झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पवार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.