

वैद्यकीय परिषदेची निवडणूक घेण्याचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची मागणी फेटाळली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची मागणी फेटाळून लावत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्याने डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयाचे वैद्यकीय क्षेत्रातून स्वागत करण्यात येत असून, सरकारने सुचवलेल्या नामनिर्देशित पद्धतीला विरोध करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत, निवडणूक प्रक्रिया अबाधित राहावी ही सरकारची जबाबदारी असल्याचे परिषदेच्या सदस्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे माजी अध्यक्ष डाॅ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले की, लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया महत्त्वपूर्ण असते. निवडणूक प्रक्रियेने स्थापित झालेली परिषद ही डाॅक्टरांच्या हिताची असेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रात नक्कीच दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
-------------
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी सरकारने हे धोरण आखले ते निंदनीय होते. नामनिर्देशित पद्धतीने सदस्य निवडण्याची जी प्रक्रिया ठरवली होती, तो निर्णय चुकीचा होता. अशा निर्णयामुळे लोकशाहीचा घात होत आहे असे वाटते. कोणतीही निवडणूक संविधानिक पद्धतीने झाली पाहिजे. यामध्ये लोकशाहीचा आणि लोक मताचा आदर झाला पाहिजे. या निवडणुकीला राजकीय पक्षाने किंवा महाराष्ट्र सरकारने विरोध करू नये. यासोबतच आता जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो.
-डॉ. हेमंत वाघ, उमेदवार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.