अलिबाग समुद्रकिनारी महिलेचा मृतदेह

अलिबाग समुद्रकिनारी महिलेचा मृतदेह
Published on

अलिबाग समुद्रकिनारी महिलेचा मृतदेह
अलिबाग, ता. २३ (वार्ताहर) : अलिबाग शहरातील समुद्रकिनारी बुधवारी (ता. २२) सायंकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. तिने लिहून ठेवलेल्या एका चिठ्ठीवरून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘पी. जी. पाटील’ अशी सही त्या चिठ्ठीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अलिबाग समुद्रकिनारी बुधवारी सायंकाळच्या सुमारास एक महिला बेशुद्धावस्थेत असल्याचे जीवरक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत तातडीने अलिबाग पोलिस ठाण्यात माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांच्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्धावस्थेत असलेल्या महिलेच्या बाजूला एक पर्स होती. त्या पर्सची पाहणी केली असता, ओळखीचा कोणताही पुरावा सापडला नाही. महिलेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत असल्याचे घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com