डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक

डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे 
काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक
Published on

डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे
काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते या विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी कार्यरत हाेते.
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश अध्यक्षपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांची काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाच्या राष्ट्रीय समन्वयकपदी निवड केली आहे.

महाराष्ट्रात नवा अध्यक्ष
हत्तीअंबिरे यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी अनिरुद्ध वनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रपूरचे अनिरुद्ध वनकर हे प्रसिद्ध आंबेडकरी गायक, नाटककार असून, अनेक वर्षांपासून ते सामाजिक चळवळीत कार्यरत आहेत. माजी मंंत्री नितीन राऊत आणि राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे हे आपल्या समर्थकाची या पदावर नियुक्ती व्‍हावी यासाठी प्रयत्नशील होते; मात्र हत्तीअंबिरे यांचा शब्द अंतिम ठरल्याची चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com