

उकाड्याने नागरिक हैराण
मुरबाड तालुक्यात पारा ४३ अंशांवर
मुरबाड ता. २५ (वार्ताहर) : राज्यभर उष्णतेची लाट कायम असताना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात तापमानाने ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत ४३ अंश सेल्सिअसचा पारा चढल्याचे दिसून आला.
तीव्र उन्हामुळे शेतकरी, मजूर तसेच बांधकाम क्षेत्रातील कामगारांना मोठा फटका बसत आहे. दुपारच्या वेळेत काम करणे कठीण झाल्याने अनेक ठिकाणी कामाचे तास बदलण्यात आले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींमध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
------------
पाणीटंचाईची शक्यता
तापमानवाढीचा परिणाम पाणीपुरवठ्यावरही होत असून, पाण्याच्या टंचाईची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विहिरी व बोअरवेलची पाणी पातळी घटत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. वाढत्या तापमानामुळे मुरबाड तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले असून, येत्या काही दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.