जैन इंटरन्रॅशनल संस्थेला देण्यास विरोधी पक्षाचा विरोध

जैन इंटरन्रॅशनल संस्थेला देण्यास विरोधी पक्षाचा विरोध
Published on

वसतिगृहाचे व्यवस्थापन ‘जेआयओ’ला देण्यास विरोध
मुंबई, ता. २५ ः कांदिवली (पूर्व) विभागातील आकुर्ली गांव येथील मुलींच्या वसतिगृहाचे व्यवस्थापन जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन (जेआयओ) संस्थेकडे देण्याच्या प्रस्तावाला विरोधी पक्षांनी सुधार समितीत कडाडून विरोध केला; मात्र विरोधकांना न जुमानता प्रस्ताव मंजूर केल्याने विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आकुर्ली येथे पालिकेने १८ वर्षांवरील मुलींसाठी बांधलेल्या वसतिगृहाचे व्यवस्थापन करण्यासाठी जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या संस्थेच्या नियुक्तीचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत आला. विरोधी सदस्यांना डावलून तो मंजूर केल्याने सुधार समिती अध्यक्षांनी मुस्कटदाबी करून मनमानी पद्धतीने तो मंजूर केल्याचा आरोप विरोधकांनी केला. हा प्रकार लोकशाहीला धरून नाही, असे काँग्रेसचे गटनेते आश्रफ आझमी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com