

बोईसरमधील चोरीचे अंबरनाथपर्यंत धागेदोरे
बोईसर, ता. २७ (वार्ताहर) : बोईसर येथून रिक्षाचालकाची सोन्याची चेन चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अंबरनाथमधून अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पालघर येथून रिक्षामधून प्रवासी घेऊन बोईसरकडे निघालेले रूपेश खुर्दे (रा. आंबेडकरनगर) यांना बोईसर येथे पोहोचल्यानंतर आरोपीने मधुर नाका येथील बीयर घेण्यास सांगितले. दोघांनी रिक्षामध्ये बसून बीयर घेतली. त्यानंतर आरोपीने गोड बोलून फिर्यादीच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन पाहण्यासाठी मागितली. विश्वास ठेवून फिर्यादींनी चेन काढून दिल्यानंतर आरोपी लघुशंकेचा बहाणा करून पसार झाला. याप्रकरणी १५ एप्रिलला बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्हीच्या आधारे मोहम्मद शहाला (४३, रा. अंबरनाथ) अंबरनाथ येथून अटक केली. न्यायालयाने त्याला २७ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.