छत्रपती शिवाजी महाराजांचे शक्तीपीठ सर्वांसाठी प्रेरणादायी : रितेश देशमुख

छत्रपती शिवाजी महाराजांचे शक्तीपीठ सर्वांसाठी प्रेरणादायी : रितेश देशमुख
Published on

शिवाजी महाराजांचे शक्तीपीठ सर्वांसाठी प्रेरणादायी : रितेश देशमुख
भिवंडी, ता. २६ (वार्ताहर) ः छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठाची महती मी बरीच ऐकली होती. त्यामुळे मी आज या ठिकाणी येऊन दर्शन घेतले. हे भव्यदिव्य मंदिर आणि या परिसरातील कलाकृतींमधून महाराजांचा संपूर्ण इतिहास सर्वांसमोर मांडला आहे, असे प्रतिपादन मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांनी येथे केले आहे.
रितेश देशमुख यांचा ‘जय शिवाजी’ हा मराठी चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठाला शनिवारी सायंकाळी भेट दिली. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. महाराजांच्या श्रद्धेपोटी, प्रेमापोटी एवढे भव्य मंदिर उभारले याबद्दल शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजुभाऊ चौधरी यांचे अभिनंदन करीत या शक्तीपीठ ठिकाणी मी आज आलो, भविष्यातही येत राहीन, असे रितेश देशमुख यांनी सांगितले.
------
आक्षेपार्ह खपवून घेणार नाही
आमदार संजय गायकवाड आणि बागेश्वर येथील धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काढलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल विचारले असता, त्यांनी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेले कोणीही खपवून घेणार नाही, असे रितेश देशमुख यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com