

जनगणना २०२७ तयारीला वेग
पनवेल महापालिकेचे प्रशिक्षण यशस्वी
पनवेल, ता. २७ (बातमीदार) ः जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर पनवेल पालिकेकडून पर्यवेक्षक व प्रगणकांसाठी आयोजित तीनदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. २३ ते २५ एप्रिलदरम्यान आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. के. हायस्कूल (इंदुबाई वाजेकर इंग्लिश माध्यम) येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या प्रशिक्षणाचा उद्देश जनगणना प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्ययावत डिजिटल प्रणाली, तांत्रिक कौशल्ये आणि क्षेत्रीय कामकाजासाठी आवश्यक प्रक्रियांची सखोल माहिती देणे हा होता. यंदाच्या जनगणनेत डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार असून, मोबाईल ॲप आधारित डेटा संकलन पद्धतीवर विशेष भर देण्यात आला. प्रशिक्षणादरम्यान ‘हाउस लिस्टींग अँड हाउसिंग सेन्सस’ या टप्प्याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. घरांची नोंदणी, कुटुंबीयांची माहिती, निवास स्थिती व उपलब्ध सुविधांची अचूक नोंद कशी करावी याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. तसेच मोबाईल ॲपद्वारे डेटा एंट्री, व्हॅलिडेशन, त्रुटी दुरुस्ती, रिअल-टाइम सबमिशन आणि डेटा सुरक्षेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास उपायुक्त प्रसन्नजित कार्लेकर, उपायुक्त (जनगणना) अभिषेक पराडकर, जिल्हा जनगणना प्रमुख अमनकुमार आणि जनगणना प्रमुख रविना येवले यांनी मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.