

आंबोली पुलावर ट्रक उलटला
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात
कासा, ता. २८ (बातमीदार)ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील आंबोली पूल परिसरात अनियंत्रित ट्रक पलटी झाल्याने चालक किरकोळ जखमी झाला. या अपघातामुळे मंगळवारी सकाळी काही काळासाठी वाहतूक विस्कळित झाली होती.
मुंबई-अहमदाबाद वाहिनीवरील हॉटेल काठीयावाडी समोर आंबोली पुलावर अपघात झाला. पुठ्याच्या बॉक्सने भरलेला ट्रक मुंबईकडून गुजरातकडे जात होता. या वेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला.अपघातात चालक आझादला (वय ४५, रा. उत्तर प्रदेश) किरकोळ दुखापत झाली. कासा येथील त्यां जिल्हा उपरुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.
----------------------------------
वाहतुकीत अडथळे
अपघातानंतर ट्रकमधील पुठ्याचे बॉक्स रस्त्यावर विखुरल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. चारोटी महामार्ग पोलीस केंद्राचे पोउपनिरीक्षक एम.एच.मकानदार यांच्याह सहा अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेत एक मार्ग सुरू केला. त्यानंतर खासगी क्रेनच्या सहाय्याने ट्रक हटवण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास कासा पोलिस ठाणे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.