वसई हे गोवा, कोकणाची आठवण करून देते

वसई हे गोवा, कोकणाची आठवण करून देते
Published on

वसई हे गोवा, कोकणाची आठवण करून देते
प्रा. डॉ. मृदुला दाढे यांचे प्रतिपादन

वसई, ता. २८ (बातमीदार) : वसईचा परिसर हा आम्हाला आकर्षित करत आहे. या वातावरणात गीतांचा, संगीताचा आस्वाद घेतला पाहिजे. वसई गाव हे गोवा, कोकणाची आठवण करून देत असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. मृदुला दाढे यांनी केले. ‘असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे, फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत’ या कवयित्री शांता शेळके यांच्या कवितेने संजीवनी परिवाराने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेची सुरुवात दाढे यांनी केली.

त्यानंतर आशताईंच्या ‘ही वाट दूर जाते’ या गाण्यातील सौंदर्यस्थळे उलगडताना शब्द आणि भावना, संगीतकारांची प्रतिभा, वैशिष्ट्ये दाखवताना बाबूजींचे ‘का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला’, ‘जीवलगा कधी रे येशील तू’ या गाण्यातील शब्दाचे वजन, उकारातील मुलायमपणा, अर्थाप्रमाणे येणारे आरोह, अवरोह गाऊन दाखवले. श्रीनिवास खळे यांचे वैशिष्ट्य नोंदवताना ‘सुंदर ते ध्यान’ या अभंगाचा उल्लेख करून ‘ध्यान’ हा शब्द कसा उच्चारला आहे हे बघण्याचे आवाहन करत, त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध व तल्लीन केले.

नालासोपारा, उमराळे येथे आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत अध्यक्षस्थानी संगीत शिक्षिका मनीषा आपटे होत्या. प्रास्ताविक रीमा नाईक, सूत्रसंचालन ईशिका पाटील यांनी केले, तर ईशस्तवन अरविंद पाटील, कौस्तुभ पाटील, सुविधा नाईक व मंगला नाईक यांनी सादर केले. यावेळी रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com