धामणी धरणात केवळ ३६.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक

धामणी धरणात केवळ ३६.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक
Published on

धामणी धरणात ३६ टक्के साठा
कडक उन्हाळ्यामुळे प्रशासन सतर्क
कासा, ता. ४ (बातमीदार)ः पालघर जिल्ह्यातील महत्त्वाच्या जलस्रोतांपैकी एक असलेल्या धामणी, कवडास धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. तापमानात वाढ झाल्याने दोन्ही धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
धामणी धरणाची सध्याची पातळी १०४.४९५ मीटर आहे. त्यामध्ये १०१.२२० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा धरणाच्या एकूण क्षमतेच्या ३६.५५ टक्के इतकाच आहे. गेल्या वर्षी २ मे रोजी धामणी धरणात ४०.५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा त्यात घट झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने काही आठवड्यांत जलसाठ्यावर ताण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने नागरिकांना केले आहे.
--------------------------
सध्याचा पाणीसाठा पुरेसा असून, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे.
-प्रवीण भुसारे, अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com