

भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) : प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या आणाभाका घेत तरुणीवर ती अल्पवयीन असल्यापासून अत्याचार करण्यासह तिची लाखोंची आर्थिक फसवणूक केल्याची घटना भोईवाडा पोलिस ठाणे हद्दीतून समोर आली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण रोड येथे राहणाऱ्या तरुणाने २१ वर्षीय युवतीला ती अल्पवयीन असल्यापासून प्रेमाच्या शपथा देत प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केले. तसेच त्याचे व्हिडिओ चित्रण करीत व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेकडून तब्बल १२ लाख रुपये उकळले. तसेच पैसे परत न करता फसवणूक केली. त्यामुळे पीडितेने भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.