

जुबेर अन्सारीला ११ मेपर्यंत पोलिस कोठडी
मिरा रोड ‘वुल्फ अटॅक’ प्रकरण; संशयास्पद कॉल्सची चौकशी सुरू
ठाणे, ता. ४ : मिरा रोड येथील चर्चित ‘वुल्फ अटॅक’ प्रकरणातील आरोपी जुबेर अन्सारी याला सोमवारी (ता. ४) दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाणे जिल्हा न्यायालयात हजर केले. पुढील तपासासाठी न्यायालयाने त्याला ११ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
‘वुल्फ अटॅक’ प्रकरणाचा तपास मिरा रोड पोलिसांकडून ठाणे एटीएसकडे वर्ग करण्यात आल्यानंतर तपासाला गती मिळाली आहे. तपासादरम्यान, अन्सारीने काही संशयास्पद व्हॉइस कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, तो भारतातून अमेरिकेत ऑनलाइन ट्युशन घेत असल्याचाही सुगावा तपास यंत्रणांना लागला आहे. या व्यवहारामागील नेमके कारण काय, तसेच त्याचे अन्य कोणाशी संबंध आहेत का, याचा सखोल तपास एटीएसकडून सुरू आहे. या सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी एटीएसने न्यायालयाकडे सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जुबेर अन्सारी याला ११ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.