

शिवरायांचा अपमान सहन करणार नाही
युवक काँग्रेसचा इशारा
घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ अमृतनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ईशान्य मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘हर हर महादेव’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.
युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विरोधात अशा प्रकारची वक्तव्ये करणे निंदनीय असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष केतन शाह, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष समीर अख्तर, वॉर्ड अध्यक्ष खलील खोत, नासिर खान, ब्रिजेश शर्मा, युवक तालुका अध्यक्ष आदित्य गीते, अरुण पांडे, मुंबई युवा महासचिव मनोज संसारे तसेच ईशान्य मुंबई जिल्हा युवक अध्यक्ष शेखर जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलन शांततेत पार पडले असून शिवरायांबद्दल कोणताही अपमान सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या वेळी देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.