विजेचा धक्का लागून तीन जनावरांचा मृत्यू

विजेचा धक्का लागून तीन जनावरांचा मृत्यू
Published on

विजेच्या धक्क्याने जनावरांचा मृत्यू
डोंगस्ते गावातील घटना

वाडा, ता. ६ (बातमीदार) ः दगड खाणीतील पाण्यातील विजेच्या प्रवाहाशी संपर्कात आल्याने तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. डोंगस्ते गावच्या हद्दीत बुधवार (ता. ६) दुपारी ही घटना घडली.
डोंगस्तेचे शेतकरी विठ्ठल भोईर सकाळी जनावरे चरण्यासाठी जंगलात घेऊन गेले होते. जनावरे चारा खाऊन झाल्यानंतर पाणी पिण्यासाठी खदाण परिसरात गेली होती. या वेळी काही जनावरे पाण्यात उतरली असता विद्युत वाहिनीच्या संपर्कात आली. या प्रकारामुळे दगड खाण परिसरात सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची तसेच शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com