रिक्षा नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू

रिक्षा नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू
Published on

रिक्षा नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू

पेण, ता. ६ (वार्ताहर) : पेण-खोपोली राज्यमार्गावरील गणपतीवाडी पुलावरून रिक्षा थेट भोगावती नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. संबंधित रिक्षा पेण शहरातून कामार्ली येथील दिशेने जात होती. गणपतीवाडी पुलाजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा थेट नदीपात्रात कोसळली. या अपघातात रिक्षाचालक एकनाथ किसन किंजवडे (वय ५३) यांचा जागीच मृत्यू झाला. भूषण पाटील (रा. कराडे, रसायनी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी म्हात्रे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com