

सभागृहात गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांची कानउघाडणी
मुंबई, ता. ६ : संख्याबळाअभावी वडाळ्यातील गृहनिर्माण संस्थेचा मंजूर होणारा प्रस्ताव नामंजूर करण्याची वेळ भाजपवर आली. या प्रकारानंतर भाजपच्या नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आली होती. ३५ ते ४० नगरसेवकांनी नोटिशीला उत्तर देताना खुलासा केला तो न पटणारा असल्याने नगरसेवकांना, भविष्यात अशी चूक होऊ नये याची खबरदारी घ्यावी, अशी समज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवकांना दिल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.
वडाळ्यातील गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्ताव महापालिकेच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तातडीचे कामकाज म्हणून महापौर रितू तावडे यांनी प्रस्ताव सभागृहात पटलावर ठेवला; मात्र सत्ताधाऱ्यांकडे बहुमत आहे की नाही, याची या वेळी खात्री करण्यात आली नाही. याचाच फायदा घेत शिवसेना ठाकरे गटाने तातडीच्या कामकाजासाठी मतदान घेण्याची मागणी केली. अखेर हा प्रस्ताव मतदानासाठी टाकला असता, भाजप शिवसेनेकडे बहुमत नसल्यामुळे तातडीचे कामकाज म्हणून प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे सत्ता असूनही भाजपावर नामुष्की ओढवली. याची गंभीर दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे समजते.
...
नेत्यांची बैठक
सभागृहात अथवा समितीमध्ये एखादा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल अथवा एखादा प्रस्ताव मंजूर करायचा असेल तर कोणती काळजी घ्यावी, यासाठी मुंबईतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महापौर रितू तावडे यांच्यासह वरिष्ठ नगरसेवकांची मंगळवारी भाजपच्या दादर येथील पक्ष कार्यालयात शाळा भरवली होती. या वेळी पालकमंत्री ॲड. आशीष शेलार, मुंबई अध्यक्ष अमित साटम, भाजप नेते प्रवीण दरेकर व अन्य ज्येष्ठ नेते तसेच सभागृह नेता गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे व वरिष्ठ नगरसेवक तसेच समित्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. या वेळी सभागृहात उडणाऱ्या गोंधळाबद्दल नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.