

रोहित शर्माची अमित नाईक यांना सदिच्छा भेट
जिल्हा परिषद विजयानंतर पहिली भेट; विकासकामांत पारदर्शकतेचा सल्ला
अलिबाग, ता. ७ (वार्ताहर) ः भारतीय क्रिकेटपटू व माजी कर्णधार रोहित शर्मा याने रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित नाईक यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर झालेली ही पहिलीच भेट विशेष ठरली.
या वेळी रोहित शर्मा याने अमित नाईक यांचे जिल्हा परिषद सदस्य तसेच मुख्य प्रतोद म्हणून झालेल्या निवडीबद्दल अभिनंदन केले. आगामी कार्यकाळात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे, तसेच विकासकामांमध्ये पारदर्शकता व सातत्य राखण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले.
या भेटीमुळे आपल्याला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करत अमित नाईक यांनी जनतेच्या सेवेसाठी अधिक जबाबदारीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. रोहित शर्मा यांसारख्या व्यक्तिमत्त्वाच्या शुभेच्छा मिळणे ही मोठी प्रेरणा आहे. जनतेचा विश्वास कायम ठेवत विकासाला गती देण्याचा प्रयत्न राहील, असे रायगड जिल्हा परिषद अमित नाईक यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.