

अवकाळी पावसाने झोडपले
मोखाडा परिसरात हजेरी, नागरिकांची धावपळ
मोखाडा, ता. ७ (बातमीदार)ः परिसरात अवकाळी पावसाने बुधवारी दुपारी अचानक हजेरी लावली. या पावसामुळे बाजारहाटीसाठी आलेल्या नागरिकांची तसेच घरे शाकारणाऱ्यांची धावपळ उडाली.
मोखाडा परिसरात तीन दिवसांपासून उन्हासोबत ढगाळ वातावरण निर्माण होत होते. अशातच बुधवारी दुपारनंतर अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सगळ्यांची धावपळ उडवली. पावसाळ्यापूर्वी घरे शाकारण्याची गावोगावी लगबग सुरू होती. बाजारहाटीसाठी खोडाळा, मोखाडा बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अशातच दुपारी दोनच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट निर्माण झाला होता.
----------------------------------
उन्हाच्या काहिलीतून सुटका
पावसामुळे तयार झालेल्या आंबा, काजू पिकाला फटका बसला आहे. फळपिकांचा दर्जावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. वीज पुरवठा सातत्याने खंडित होत होता. तर उन्हाच्या काहिलीने त्रस्त नागरिकांना अवकाळीने सुखद दिलासा दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.