

किरीट सोमय्या यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
खालापूर, ता. ७ (बातमीदार) ः भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी (ता. ६) खोपोली येथे भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या यशानंतर भाजप कार्यकर्ते उत्साहात आहेत.
महाराजा मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, खोपोली उपनगराध्यक्ष विक्रम साबळे जिल्हा परिषद माजी सभापती नरेश पाटील, भाजप खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी अत्रे, राजेश लाडसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. खोपोली नगर परिषदेचा नगराध्यक्ष भाजपाचा करण्यासाठी कार्यकर्ते यांनी चिकाटीने कामाला लागा, अशा सूचना सोमय्या यांनी केल्या.
खोपोली भाजपचे नेते यशवंत साबळे यांनी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. यामध्ये किरीट सोमय्या यांनी लक्ष घातल्यास साबळे यांची ताकद वाढणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.