अमित शहांविरोधातील याचिका कुहेतूने!

अमित शहांविरोधातील याचिका कुहेतूने!
Published on

अमित शहांविरोधातील याचिका कुहेतूने!
सोहराबुद्दीनप्रकरणी न्यायालयाचे निरीक्षण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : सोहराबुद्दीनसह अन्य कथित बनावट चकमकप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना या प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका ही शहा यांच्या काही राजकीय विरोधकांच्या सांगण्यावरून कुहेतूने केल्याचे निरीक्षण २२ जणांच्या निर्दोष सुटकेचा निर्णय कायम ठेवताना उच्च न्यायालयाने आदेशात नोंदवले.
याप्रकरणी अमित शहांना दोषमुक्त करण्याच्या निर्णयाला मणियार कल्पेश कुमार यांनी उच्च न्यायालयात अंतरिम याचिकेद्वारे आव्हान दिले होते. मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने त्याची याचिका फेटाळून लावली. ही याचिका धूर्त किंवा कुहेतूने आणि शहांच्या राजकीय विरोधकाच्या सांगण्यावरून कदाचित करण्यात आल्याचेही न्यायालयाने आदेशपत्रात स्पष्ट केले.  प्रकरणातील २२ आरोपींची निर्दोष सुटकेविरोधात सोहराबुद्दीनच्या दोन भावांनी केलेले अपील प्रलंबित असतानाच मणियारने ही अंतरिम याचिका केली होती.
...
न्यायालयाचे निरीक्षण
सीबीआयने दिलेली माहिती कुमारने दडवली. तसेच आरोपींच्या निर्दोष सुटकेविरोधातील अपिलावर निकाल राखून ठेवण्यात आल्याची माहिती त्याला कशी प्राप्त झाली हे याचिकाकर्त्याने याचिकेत स्पष्ट केलेले नाही. त्याचप्रमाणे, सीबीआयने याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल केला असून, त्यातही तो साक्षीदार नाही. आरोपींच्या निर्दोष सुटकेविरोधात दाखल अपिलाशी त्याचा नेमका काय संबंध आहे आणि गुन्हा दाखल होऊन सुमारे दोन दशके उलटल्यानंतर आताच तो समोर का आला, असे प्रश्न उपस्थित करून न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
...
तपास यंत्रणा अपयशी
तपास यंत्रणा याप्रकरणी २२ आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. सरकारी पक्षाचा खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता आणि या घटनांच्या साखळीत अनेक दुवे अपूर्ण असल्याकडे न्यायालयाने आदेशपत्रात लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com