

रिक्षाचालकाने कारचालकाला फरपटत नेले
ठाणे, ता. ८ ः कारला धडक दिल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात रिक्षाचालकाने कारचालकाला काही अंतर फरपटत नेले. हा प्रकार गुरुवारी (ता. ७) रात्री घडला. यात कारचालक गंभीर जखमी असून याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासारवडवली परिसरात राहणारे ४६ वर्षीय कारचालक गुरुवारी कुटुंबीयांसह नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे नातेवाइकांकडे गेले होते. रात्री घरी परतत असताना ब्रह्मांड सिग्नलजवळ वाहतूक कोंडीमुळे त्यांच्या कारचा वेग कमी झाला होता. त्या वेळी मागून आलेल्या रिक्षाने कारच्या डाव्या बाजूला धडक दिली. अपघातानंतर कारचे नुकसान झाल्याने कारचालकाने रिक्षाचालकाला जाब विचारला. त्या वेळी रिक्षाचालकाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
रिक्षा थांबवण्यासाठी कारचालकाने हॅण्डल पकडले असता चालकाने वेग वाढवला. त्यामुळे कारचालक काही अंतर फरपटत गेला. यात त्यांच्या डोक्याला, डाव्या हाताला दुखापत झाली असून डाव्या पायाच्या मांडीच्या हाडाला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास चितळसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.