

बापानेच केला पोटच्या लेकींवर अत्याचार
कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : डोंबिवली शहरात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका बापाने आपल्या दोन पोटच्या मुलींवरच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत या ४५ वर्षीय नराधमाला अटक केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील मानपाडा परिसरात राहणाऱ्या एक ४५ वर्षांचा व्यक्ती पत्नी कामानिमित्त बाहेर असल्याच्या संधीचा फायदा घेऊन आपल्या १९ वर्षांच्या मोठ्या मुलीवर गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता; मात्र याबाबत घाबरलेल्या मुलीने आईला याबद्दल सांगितले नाही. त्यामुळे त्या विकृत बापाची हिंमत अधिक वाढली. अत्याचाराचा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून पीडित मोठी मुलगी सहन करत होती. त्यानंतर या नराधमाची मजल आणखीन वाढली आणि त्याने तिची लहान १० वर्षांच्या बहिणीवरदेखील अत्याचार केल्याने मोठ्या बहिणीने याविरोधात आवाज उठून घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. तिने लागलीच मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन याविरोधात मुलींच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मानपाडा पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.