कडक उन्हाचा भाज्यांवर परिणाम

कडक उन्हाचा भाज्यांवर परिणाम
Published on

जनजीवनावर उष्णतेचा प्रकोप
कासा, ता. १० (बातमीदार)ः डहाणू परिसरात वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. तसेच वाहतूक, साठवणुकीदरम्यान भाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने २० ते ३० रुपयांनी महाग झाल्या आहेत.
डहाणू परिसरात नाशिक, मालेगाव, वापी, ठाणे परिसरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला पुरवला जातो. याशिवाय स्थानिक शेतकरीही काही प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करतात. त्यामुळे काही दिवसांपूर्वी बाजारात स्वस्त असलेला भाजीपाला उपलब्ध होत होता, पण तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेल्याने भाजीपाला उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असून, कोथिंबीर, फ्लॉवर, कैरी, लसूण, वालपापडी, गवार, शेवगा, भेंडी, कोबी, मिरची, गाजर, आले, वांगी, कारले, काकडी, दोडक्याचा भाव वाढला आहे.
---------------------------
खिशाला झळ
लसूण तब्बल १४० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. १० ते २० रुपयांत मिळणारी मेथी, पालक, शेपूची जुडी ४० रुपयांपर्यंत विकली जात आहे. शेवग्याच्या शेंगांचे भाव दुपटीने वाढले असून, १५ रुपये किलो मिळणारा टोमॅटो पुन्हा ४० रुपये किलोवर गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.
------------------------
नाशिक मार्केटमधून पहाटे टेम्पो भरून मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणतो. मात्र, सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने उत्पादन कमी झाले आहे. तसेच भाजीपाला खराब होत असल्याने भाव वाढले आहेत.
- सय्यद खान, भाजीविक्रेता
----------------------
१५ दिवसांपूर्वीपर्यंत भाजीपाला स्वस्त होता. मात्र, आता वाढलेल्या उन्हामुळे भाव वाढले असून, मोठा आर्थिक फटका बसत आहे.
- दिप्ती पाटील, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com