विनाऔषध-विनाऑपरेशन उपचारांची २५ वर्षांची परंपरा

विनाऔषध-विनाऑपरेशन उपचारांची २५ वर्षांची परंपरा
Published on

विनाऔषध-विनाऑपरेशन उपचारांची २५ वर्षांची परंपरा
डॉ. लोहिया ॲक्युपंक्चरचे सायन येथे नवीन क्लिनिक सुरू
मुंबई, ता. १० : गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ मुंबईकरांच्या विश्वासाचे केंद्र ठरलेल्या ‘डॉ. लोहिया ॲक्युपंक्चर’तर्फे आता सायन येथे नवीन क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. दादर, ठाणे, अंधेरी, पनवेल, वाशी तसेच मुंबईतील विविध भागांतील रुग्णांचा वाढता प्रतिसाद, विश्वास आणि उपचारांची वाढती मागणी लक्षात घेऊन हे नवीन केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.
‘डॉ. लोहिया ॲक्युपंक्चर’ने गेल्या अनेक वर्षांत औषधांशिवाय आणि शस्त्रक्रियेशिवाय हजारो रुग्णांना वेदनामुक्त आणि आनंदी आयुष्य मिळवून दिले आहे. पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, स्लिप डिस्क, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस, महिलांचे आजार तसेच विविध दीर्घकालीन समस्यांवर ॲक्युपंक्चर उपचारांद्वारे अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रुग्णांचा वाढता विश्वास आणि सकारात्मक अनुभव यामुळे ‘डॉ. लोहिया ॲक्युपंक्चर’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून, आता सायनमधील नवीन क्लिनिकमुळे मध्य मुंबईतील रुग्णांना अधिक सुलभ आणि जलद सेवा उपलब्ध होणार आहे. रुग्णांना नैसर्गिक पद्धतीने, विनाऔषध आणि विनाऑपरेशन उपचार मिळावेत, हा आमचा मुख्य उद्देश आहे. हजारो रुग्णांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आणण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत, असे पेन फिजिशियन आणि सीनियर ॲक्युपंक्चरतज्ज्ञ डॉ. सचिन लोहिया यांनी एक मुलाखतीद्वारे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com