

८ वर्षांनंतर उलवे खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप
उलवे, ता. ११ (बातमीदार) ः उलवे येथे २०१८ मध्ये झालेल्या खून प्रकरणाचा निकाल तब्बल आठ वर्षांनंतर लागला आहे. पनवेल जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.आर. उगाले यांनी आरोपी संदीप गुप्ता याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून ५० हजारांचा दंडही ठोठावला आहे.
संदीप गुप्ता याने आपल्या बहिणीच्या सासऱ्याकडून ७० हजार रुपये कर्ज घेतले होते. वारंवार परतफेडीची मागणी होत असल्याने त्याने २२ एप्रिल २०१८ रोजी उलवे येथील रामप्रसाद गुप्ता यांच्या घरी जाऊन चाकूने त्यांची हत्या केली. यावेळी पत्नी लक्ष्मी देवी यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्यावरही हल्ला केला. त्यानंतर संदीपने घरातील सोन्याचे दागिने व रोकड घेऊन पलायन केले. जखमी अवस्थेतही लक्ष्मी देवी यांनी धाडस दाखवत आरोपीविरोधात महत्त्वाचा पुरावा दिला. त्यांच्या साक्षीसह अन्य १६ साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. तसेच, दंडाची रक्कम पीडित पत्नीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आणि जप्त केलेले दागिने व रोकड परत करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.