ठाण्यात ट्रकचा अपघात

ठाण्यात ट्रकचा अपघात
Published on

ठाणे, ता. ११ : पूर्व द्रुतगती महामार्गावर ज्युपिटर हॉस्पिटलसमोर ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटून सोमवारी मध्यरात्री १२ ते १२.१५ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. या घटनेत चालक बचावला असून, कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, काही मिनिटे वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाला रात्री १२.१३ वाजण्याच्या सुमारास या अपघाताची माहिती मिळताच पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि शहर वाहतूक पोलिसांचे कर्मचारी हायड्रासह घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त ट्रक हायड्राच्या साह्याने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला. तसेच रस्त्यावर सांडलेल्या तेलावर माती टाकून रस्ता सुरक्षित केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघातग्रस्त ट्रकचे मालक कमलेश यादव असून चालक मुकेश कुमार गौतम हे मुंबईहून घोडबंदरच्या दिशेने १२ टन पुठ्ठ्याचा माल घेऊन जात होता. त्यावेळी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली

Marathi News Esakal
www.esakal.com