

वॉलमार्टचे अध्यक्ष जॉन फर्नर यांची भारतातील उद्योजकांशी चर्चा
नवी दिल्ली, ता. ११ : वॉलमार्ट इन्क.चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन फर्नर यांनी भारतातील उच्च-वाढीच्या, डिजिटल-फर्स्ट ग्राहक ब्रँड्स उभारणाऱ्या संस्थापक आणि व्यावसायिक नेत्यांच्या गटाशी नुकताच संवाद साधला. त्यांच्या या बैठकीत ब्युटी आणि पर्सनल केअर, फूड अँड बेव्हरेजेस, लाइफस्टाइल आणि अपॅरल तसेच फ्रेग्रन्सेस आणि पेट केअर यांसारख्या विविध क्षेत्रांतील संस्थापक सहभागी झाले होते. नवी दिल्लीत झालेल्या या चर्चेत वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टच्या नेतृत्वासोबत ब्रँड उभारणीचा प्रवास, डिजिटल माध्यमांतून व्यवसाय वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार यावर मुक्त चर्चा झाली.
‘भारतामध्ये ग्राहक ब्रँड्स उभारत असलेल्या संस्थापकांसोबत वेळ घालवणे अत्यंत प्रेरणादायी होते. भारतासाठी आणि जगासाठी व्यवसाय उभारण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा, तसेच गुणवत्ता, नवकल्पना आणि ग्राहक अनुभवावर असलेला त्यांचा भर विशेष जाणवला. वॉलमार्टमध्ये आम्ही या प्रवासाला पाठिंबा देण्यासाठी आणि व्यवसायांना विविध बाजारपेठांतील ग्राहकांशी जोडण्यासाठी कटिबद्ध आहोत,’ जॉन फर्नर यांनी सांगितले. या बैठकीला आर्यनवेदा, बेला व्हिटा, भाषा भारत, ग्रोव्हर इंटरनॅशनल अँड ग्रोव्हर निर्यात, जुगमग शूज, खानाल फूड्स, लिटल राइड्स, ऑर्गॅनिक तत्त्व, पी-टाल, एसव्हीए ऑर्गॅनिक्स आणि वाहदम इंडिया या कंपन्यांचे संस्थापक उपस्थित होते. दरम्यान ‘आजचे उद्योजक अधिक सखोल ग्राहक समज, मोठी महत्त्वाकांक्षा आणि दीर्घकालीन दृष्टिकोनासह ब्रँड्स उभारत आहेत. फ्लिपकार्टसारखे प्लॅटफॉर्म या व्यवसायांच्या वाढीसाठी बाजारपेठेपर्यंत पोहोच, क्षमता विकास आणि भारतभर विस्ताराचे मार्ग उपलब्ध करून महत्त्वाची भूमिका बजावतात.’ असे फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांनी सांगितले. तर ‘भारताचे उदयोन्मुख ब्रँड्स आणि पुढील पिढीतील विक्रेते मजबूत उत्पादन विचारसरणी आणि डिजिटल चपळतेच्या जोरावर वेगाने विस्तार करत असल्याचे वॉलमार्ट मार्केटप्लेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनीष जोनेजा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.