

रुक्मिणीबाई रुग्णालयातील रक्षकावर हल्ला
पार्किंगवरून झालेल्या वादातून चालकाची रॉडने मारहाण
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आवारात पार्किंगवरून सुरक्षा रक्षकासोबत मारहाणीची एक गंभीर घटना आज घडली आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर गाडी पार्क करण्याची परवानगी नाकारल्याने एका संतप्त चालकाने सुरक्षा रक्षक किशोर लोटे यांच्यावर लोखंडी सळईने हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, एका रुग्णाच्या कुटुंबीयांनी त्यांची चारचाकी गाडी रुग्णालयाच्या मुख्य गेटजवळ उभी केली होती, ज्यामुळे येण्या-जाण्याचा मार्ग बंद होता. कर्तव्यावर असलेले एमएसएफचे सुरक्षा रक्षक किशोर लोटे यांनी चालकाला गाडी दुसरीकडे लावण्याची विनंती केली. चालक संतापला आणि त्याने सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपीने किशोर लोटे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि नंतर लोखंडी सळईने त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत लोटे यांच्या शरीराच्या अनेक भागांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या आवारात सुरक्षा कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.