

क्षुल्लक कारणावरून मारहाण
पोलादपूर, ता. १२ (बातमीदार) ः व्यवसायाच्या ठिकाणी मद्यपान करण्यास मज्जाव केल्याने संतप्त ग्राहकाने सहकाऱ्यांसह चायनीज सेंटर चालक आणि त्यांच्या कुटुंबाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पोलादपूर तालुक्यातील कापडे येथे शुक्रवारी (ता. ८) घडली. याप्रकरणी पोलिसांनी १२ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
कापडे येथील प्रशांत चायनीज येथे विठ्ठल साने व नंदा साने, प्रतीक साने, प्रशांत साने व कृष्णा साने काम करत होते. या वेळी अजय वाघे व अनिल वाघे हे दुकानावर येऊन ऑर्डर दिली व त्या वेळी त्यांच्या हातात बिअरची बाटली असल्याने प्रशांत साने यांनी त्यांना मद्यपान करण्यास मज्जाव केला. या गोष्टीचा राग मनात धरून अजय वाघे याने प्रशांत यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्या वेळी विठ्ठल व कृष्णा साने यांनी मध्यस्थी करत वाद सोडविला. मात्र, अजय वाघे यांनी आपल्या इतर ११ सहकारी समवेत दुकानात येऊन साने कुटुंबीयांना मारहाण केली. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.