म्हसळ्यात शाहिद जंजिरकरांचा राजीनामा

म्हसळ्यात शाहिद जंजिरकरांचा राजीनामा
Published on

म्हसळ्यात शाहिद जंजिरकरांचा राजीनामा
चार दिवसांतच सत्ता उलटली; रायगडच्या राजकारणात खळबळ
अलिबाग, ता. १२ (वार्ताहर) ः म्हसळा नगर पंचायतीतील राजकारणाने अवघ्या चार दिवसांत नाट्यमय कलाटणी घेतली असून, नुकतेच नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या शिवसेनेचे शाहिद जंजिरकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने रायगड जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सोमवारी (ता. ११) रायगड दौऱ्यावर असतानाच ही घडामोड घडल्याने राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
गुरुवारी (ता. ७) झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे शाहिद जंजिरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेडगे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. म्हसळा नगर पंचायतीतील १७ पैकी नऊ सदस्यांचे समर्थन मिळवत शिवसेनेने सत्ता काबीज केली होती. त्यामुळे स्थानिक स्तरावर शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. अवघ्या चार दिवसांतच जंजिरकर यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
म्हसळा नगर पंचायतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती व्हावी, अशी अपेक्षा वरिष्ठ पातळीवरून व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्याला बगल देत शिवसेनेने स्वतंत्र भूमिका घेत निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या होत्या. अखेर वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर जंजिरकर यांना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

चौकट
फॉर्म्युला ठरला
खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात झालेल्या चर्चेनंतर नगराध्यक्षपदासाठी तडजोडीचा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार पहिले तीन महिने राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उर्वरित कालावधी शिवसेनेकडे नगराध्यक्षपद राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत कोणत्याही पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com