ठाण्यात चार ठिकाणी घरफोड्या

ठाण्यात चार ठिकाणी घरफोड्या
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : शहरात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घालत चार वेगवेगळ्या ठिकाणी बंद घरे फोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये एकूण दोन लाख ६१ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. संबंधित कुटुंबीय गावी गेल्याने घरे बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पहिली घटना नौपाडा परिसरात घडली. तक्रारदार बवणकुमार चौधरी यांच्या घरातून चोरट्यांनी एक लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, तसेच १० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. चौधरी कुटुंब राजस्थानला गेले असताना ही चोरी झाली. दुसरी घटना मेरीडियन सोसायटीमध्ये घडली. तक्रारदार अक्षय गाढवे यांचे सासरे विश्वनाथ जाधव हे घर बंद करून गावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील ८९ हजार रुपयांची रोकड आणि १८ हजार ९०० रुपयांचे चांदीचे कॉईन असा एकूण एक लाख सात हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याच सोसायटीतील किरण अटवाल यांच्या घरीही चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. चौथी घटना वागळे इस्टेट येथील मेंटल हॉस्पिटल कर्मचारी वसाहतीत घडली. कर्मचारी मंगेश म्हात्रे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १४ हजार रुपयांची रोख रक्कम, एलईडी टीव्ही, कुलर, इलेक्ट्रिक शेगडी तसेच महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. या चारही घटनांप्रकरणी नौपाडा आणि वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल केले असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com