

अंबरनाथ, ता. १२ (वार्ताहर) : शहराच्या मध्यवर्ती भागात निसर्गस्नेही संकल्पनेतून उभारण्यात आलेले बहुचर्चित ‘अटल उद्यान’ आता नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १४) या उद्यानाचे लोकार्पण होणार असून, नगरसेविका अपर्णा भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे या उद्यानाचा कायापालट झाला आहे.
अंबरनाथ पूर्वेतील साई विभाग परिसरात उभारण्यात आलेल्या या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी सुमारे पाच कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. वाढत्या सिमेंट-काँक्रीटच्या जंगलात शहरातील नैसर्गिक सौंदर्य जपणारे हे एकमेव उद्यान आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन आणि आधुनिकीकरण व्हावे, अशी नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती. याची दखल घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून उद्यानाच्या विकासासाठी पुढाकार घेतला.
निसर्गरम्य वातावरण अबाधित ठेवत विकसित करण्यात आलेल्या या उद्यानात आधुनिक सुविधा आणि पर्यावरणपूरक रचना यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. नागरिकांसाठी सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक, खेळाडूंसाठी दोन खुले बॅडमिंटन कोर्ट, अत्याधुनिक व्यायाम साहित्य, तसेच लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी उभारण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली असून, हरित सजावट आणि प्रकाशयोजनेमुळे उद्यानाचे सौंदर्य अधिक खुलले आहे.
‘मचान’मुळे सौंदर्यात भर
विशेष म्हणजे, अंबरनाथमध्ये प्रथमच ‘मचान’ संकल्पना या उद्यानात साकारण्यात आली असून, निसर्गाच्या सान्निध्यात निवांत क्षण अनुभवण्यासाठी हे ठिकाण नागरिकांसाठी नवे आकर्षण ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.