समाधान शिबिराच्या ठिकाणात बदल

समाधान शिबिराच्या ठिकाणात बदल
Published on

पडघा, ता. १३ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील राहुर मंडळ स्तरावर घेण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे ठिकाण बदलण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. १५) आयोजित शिबिराचे ठिकाण बदलण्यात आले आहे. पूर्वी या शिबिराचे आयोजन ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय, डोहोळे येथे केले होते; परंतु तीव्र उष्णतेमुळे व अपुरी जागा असल्याने शिबिराचे ठिकाण बदलण्यात आले आहे. नवीन ठिकाण म्हणून शिबिराचे आयोजन कोशिंबी येथील खानिवली-तळवली रोडच्या बाजूला जीवन विकास सेवा ट्रस्ट (अनाथाश्रम) येथे १५ मे रोजी नियोजित वेळेत करण्यात येईल, असे आवाहन महसूल विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com