मुंबई पूणे द्रुतगती मार्गावर अपघात

मुंबई पूणे द्रुतगती मार्गावर अपघात
Published on

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात

खालापूर, ता. १४ (बातमीदार) ः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रकला धडकल्याची घटना बुधवारी (ता. १३) घडली. या घटनेत सुनीता विजय हाके (वय ४५) या महिलेचा मृत्यू झाला. कारचालक यश विजय हाके (२४) हा गंभीर जखमी झाला.
बुधवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जात असताना सावरोली गावाच्या हद्दीत यशचे कारवरील नियंत्रण सुटून कार ट्रकवर आदळली. अपघातात कारच्या समोरील भागाचा चक्काचूर होऊन यश आणि सुनीता गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचाराकरिता तातडीने पनवेल येथील रुग्णालयात हलविण्यात आले. सुनीता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर यशची प्रकृती गंभीर आहे. ट्रकचालक अहमद सैदूवाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यश हाकेविरोधात खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com