

माझ्यात शिवसेनेचाच डीएनए!
माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत माजी खासदार आनंद परांजपे १४ वर्षांनंतर शिवसेनेत परतले. बाळासाहेब भवन येथे शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत परांजपे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
घरातूनच शिवसेनेचा वारसा मिळाला. शिवसेनेकडून दोनदा खासदार बनलो. त्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान होते. मी जरी दुसऱ्या पक्षात होतो तरी माझ्यात शिवसेनेचाच डीएनए असल्याचे मत माजी खासदार परांजपे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन म्हणून काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी जनहिताचे अनेक मोठे निर्णय घेतले. त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचे परांजपे यांनी या वेळी सांगितले. तसेच पदाची कोणतीही अपेक्षा न ठेवता एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात संघटनेसाठी काम करण्याची इच्छा या वेळी परांजपे यांनी बोलून दाखवली. शिवसेनेत असताना परांजपे आणि शिंदे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे नाते होते. मधल्या काळात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या आणि त्या त्यांनी कुठल्याही अपेक्षा न ठेवता पार पाडल्या, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. आनंद परांजपे यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाला फायदा होईल, असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.