

मुंबई, ता. १५ : स्पेशालिटी केमिकल कंपनी लॅंक्सेस आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांनी भारत आणि सार्क देशांमध्ये विमानचालन आणि औद्योगिक लुब्रिकंट्सची उपलब्धता वाढवण्यासाठी करार केला आहे. याद्वारे तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि उच्च कार्यक्षम लुब्रिकंट सोल्युशन्स बाजारात आणले जातील. त्यामुळे भारतातील वेगाने वाढणाऱ्या विमानचालन आणि औद्योगिक बाजारपेठेतील मानके आणि उपलब्धता सुधारतील. या कराराअंतर्गत दोन्ही कंपन्यांद्वारे लुब्रिकंटसाठी अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन विपणन आणि व्यवसाय विकास संधीचा शोध घेतला जाईल. यामुळे औद्योगिक लुब्रिकंटची स्थानिक बाजारपेठेत आणि महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये अधिक व्यापक उपलब्धता होईल, असे लॅंक्सेसचे निलांजन बॅनर्जी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.