महिलेचे खाजगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत शरीरसुखाची मागणी;

महिलेचे खाजगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत शरीरसुखाची मागणी;
Published on

व्हिडिओ व्हायरल करण्याची
धमकी देत शरीरसुखाची मागणी
सीबीडी बेलापूरमधील दोघे पोलिसांच्या ताब्यात

नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : सीबीडी-बेलापूर परिसरात राहणाऱ्या दोघा तरुणांनी त्यांच्या परिचयातील ३५ वर्षीय महिलेच्या मोबाईलमधील तिच्या प्रियकरासोबतचा खासगी व्हिडिओ मिळवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सीबीडी पोलिसांनी या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू केली आहे.
साई घोरपडे (२१) आणि अमोल पवरे (२५) हे दोघे सीबीडी बेलापूर परिसरात राहण्यास असून, पीडित महिला त्यांच्या परिचयातील आहे. आरोपींनी पीडित महिलेच्या मोबाईलमधील तिचा आणि तिच्या प्रियकराचा खासगी व्हिडिओ चोरून पाहिला होता. याचा गैरफायदा घेत आरोपींनी पीडित महिलेला १० मे रोजी गाठले. त्यानंतर त्यांनी तिचा प्रियकरासोबतचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच बदनामी टाळायची असेल, तर त्यांच्यासोबत शरीरसंबंध ठेवावे लागतील, असे बजावले.
या प्रकारामुळे प्रचंड मानसिक धक्क्यात असलेल्या महिलेने अखेर सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना सध्या नोटीस बजावण्यात आली असून, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com