मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू

मुंबईत १० टक्के
पाणीकपात लागू
Published on

मुंबईत १० टक्के
पाणीकपात लागू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः पावसाळापूर्व नियोजनाचा भाग म्हणून पालिका कार्यक्षेत्रात शुक्रवारपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या कालावधीत सामान्य मुंबईकरांना त्रास होऊ नये, तसेच नियमित वेळेत व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होईल, हे सुनिश्चित करावे, असे निर्देश अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजित बांगर यांनी दिले.
या पार्श्वभूमीवर जल अभियंता विभागातील दुय्यम अभियंता व सहाय्यक अभियंता यांची बैठक गुरुवारी पालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी उपस्थित अधिकाऱ्यासोबत संवाद साधला.
जलवाहिन्यांवर अथवा थेट नळजोडणीवर अनधिकृतरीत्या विद्युत मोटार (पंप) लावून पाणी उपसा करणाऱ्याविरुद्ध महापालिका प्रशासनाकडून कठोर व अधिक तीव्रतेने कारवाई करावी. अशा प्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश बांगर यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com