वरिष्ठ अधिकाऱ्याची आत्महत्या

वरिष्ठ अधिकाऱ्याची आत्महत्या
Published on

मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या
विराज कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात गुन्हा
बोईसर, ता. २२ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तारापूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
विराज प्रोफाइल लिमिटेड कंपनीतील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले प्रदीप जाधव (वय ५८) यांनी शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी निवासस्थानी आत्महत्या केली होती. वरिष्ठांकडून सातत्याने मानसिक दबाव, अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमधून केला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच इतर संभाव्य कारणांचा तपास सुरू केला आहे.
----------------------------
तपासाकडे लक्ष
या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात कर्मचाऱ्यांवरील मानसिक ताण, दबाव, कथित छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे प्रकरणातील पोलिस तपासाकडे औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com