भाभा रुग्णालयाच्या रक्तपेढीवर प्रश्नचिन्ह

भाभा रुग्णालयाच्या 
रक्तपेढीवर प्रश्नचिन्ह
Published on

भाभा रुग्णालयाच्या
रक्तपेढीवर प्रश्नचिन्ह
रक्तसंकलनात ३६ टक्क्यांची घट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः मुंबई महापालिकेच्या कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयानंतर आता वांद्रे येथील भाभा रुग्णालयातील रक्तपेढीतील रक्तसंकलन घटत असल्याची बाब समोर आली. रुग्णालय प्रशासनाने राज्य रक्त संक्रमण परिषद आणि एफडीएच्या नियमानुसार, पुरेशी रक्तदान शिबिरे आणि रक्तसंकलन होत असल्याचा दावा केला आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये रक्तपेढीत १,११० युनिट रक्तसंकलन झाले होते. त्यानंतर, २०२४-२५ मध्ये हे प्रमाण घटून ८७० युनिटवर आले, तर २०२५-२६ मध्ये ते केवळ ७२९ युनिटपर्यंत खाली आले आहे. मे २०२६ मध्ये फक्त २१ युनिट रक्तसंकलन झाल्याची नोंद झाली. दरम्यान, रक्तसंकलनावर कोणताही परिणाम झालेला नाही. वार्षिक २० शिबिरे घेणे बंधनकारक आहेत, तेवढी शिबिरे घेतली जात असल्याचे भाभा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद खाडे यांनी सांगितले.
----
एकाच शिफ्टमध्ये रक्तपेढी
रक्तपेढी केवळ एका शिफ्टमध्ये चालविली जात असल्याचा आरोप करण्यात येत असून रात्रीच्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना खासगी रक्तपेढींचा आधार घ्यावा लागतो. कर्मचारी व तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता हे यामागील प्रमुख कारण असल्याचेही समोर आले आहे. यापूर्वीही भाभा रुग्णालयाच्या रक्तपेढीबाबत कर्मचारी कमतरता आणि कार्यपद्धतीतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान, रक्तपेढीतील कर्मचारी रिक्त पदे तातडीने भरून २४ तास सेवा सुरू करण्याची मागणी कर्मचारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
----
डीप फ्रिझर निष्क्रिय
रक्तपेढीत साध्या रेफ्रिरजेटरची आवश्यकता असताना चुकून पाच लाखांचा डीप फ्रिझर खरेदी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. प्लाझ्मा गोठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या यंत्राचा उपयोग करण्यासाठी आवश्यक परवाना रक्तपेढीकडे नसल्याने हा डीप फ्रिझर वर्षानुवर्षे धूळ खात पडून असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com