मद्यपींचा पोलिसांवर हल्ला

मद्यपींचा पोलिसांवर हल्ला
Published on

मद्यपींचा पोलिसांवर हल्ला

भाईंदर, ता. २२ (बातमीदार) : मद्य पिऊन गैरवर्तन करणाऱ्या मद्यपींवर कारवाई करणाऱ्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना भाईंदर येथे घडली. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

रविवारी (ता. २१) रात्री भाईंदर पश्चिम भागात एका मोकळ्या मैदानात काही जण मद्य पिऊन धिंगाणा घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. तिघांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी ठाण्यातच गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पोलिस सरकारी रुग्णालयात घेऊन गेले असता तिघांनी त्या ठिकाणीही गैरवर्तन करून रुग्णालयाच्या मालमत्तेचे नुकसान करायला सुरुवात केली. त्यांना अडविण्यासाठी आलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर आरोपींनी हल्ला करून त्यांना मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com