

ठाणे, ता. २३ : ठाण्यातील आनंदनगर परिसरातील एका ज्वेलर्स दुकानातून ग्राहक बनून आलेल्या महिला आणि पुरुषाने पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरूसिंग गंगासिंग दसाना (वय ३४) यांचे आनंदनगर येथील ग्रँड स्क्वेअर संकुलात ‘रॉयल ज्वेलर्स’ हे दागिन्यांचे दुकान आहे. २० जूनला नियमित स्टॉक तपासणीदरम्यान लहान मुलांच्या कानातील टॉप्सच्या आठ जोड्यांचे एक पाकीट दुकानातून गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, १७ जूनला रात्री साडेआठच्या सुमारास एक महिला, पुरुष आणि लहान मुलासह दुकानात आल्याचे दिसून आले. त्यांनी सुरुवातीला चांदीचे नाणे आणि नाकातील फुली खरेदी केली. त्यानंतर मुलांच्या कानातील सोन्याचे टॉप्स पाहण्याच्या बहाण्याने विविध डिझाइनची पाकिटे काउंटरवर मागवून घेतली.
त्यावेळी दुकानात इतर ग्राहकांची गर्दी असल्याने दुकानदार आणि कर्मचारी त्यांच्याकडे लक्ष देऊ शकले नाहीत. या संधीचा फायदा घेत संबंधित महिला आणि पुरुषाने १४ ग्रॅम वजनाच्या आठ जोड्या सोन्याच्या टॉप्सचे पाकीट चोरून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले आहे.
चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत एक लाख ७० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.