कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेले कामा रुग्णालय

कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेले कामा रुग्णालय
Published on

कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेले कामा रुग्णालय
१,८४४ रुग्णांना मोफत केमोथेरपी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबई राज्य सरकारद्वारे संचालित मुंबईतील कामा अँड अल्बलेस रुग्णालय कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. गेल्या वर्षी या रुग्णालयात विविध प्रकारच्या कर्करोगाने बाधित तब्बल १,८४४ महिला रुग्णांवर केमोथेरपी उपचार करण्यात आले.
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांच्या माहितीनुसार, सर्वाधिक म्हणजेच स्तन कर्करोगाच्या १,३९३ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. हे एकूण प्रकरणांच्या सुमारे ७५ टक्के आहेत. याशिवाय, अंडाशय कर्करोगाचे १५७, गर्भाशय मुख कर्करोगाचे ७१ आणि एंडोमेट्रियल कर्करोगाचे २३ रुग्ण यांच्यावरही उपचार करण्यात आले.
स्तन कर्करोगाव्यतिरिक्त, रुग्णालयात इतरही गंभीर कर्करोग रुग्णांवर उपचार झाले आहेत. यामध्ये वल्व्हर कर्करोग (२५), रेक्टम कर्करोग (२५), इसोफेगस कर्करोग (१७), फुप्फुसांचा कर्करोग (१४), गॉल ब्लॅडर कर्करोग (१७), नॉन-हॉजकिन लिम्फोमा (१०) आणि सार्कोमा (११) अशा विविध गुंतागुंतीच्या आजारांचा समावेश आहे.
रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, येथे कर्करोग रुग्णांसाठी उपचार अधिक सुलभ, परवडणारे आणि वेळेवर उपलब्ध होत असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. अनेक रुग्णांना येथे मोफत किंवा अत्यल्प खर्चात उपचार मिळत आहेत.

ब्रॅकीथेरपीद्वारे उपचार सुरू करण्याची योजना
कामा रुग्णालयात कर्करोग पीडित महिलांवर उपचारासाठी ब्रॅकीथेरपी सुरू करण्याचीही योजना आहे. अशी सुविधा सुरू करणारे कामा रुग्णालय हे मुंबईतील पहिले सरकारी रुग्णालय ठरणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर या प्रक्रियेला गती देण्यात आली असून, लवकरच ही सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

ब्रॅकीथेरपी का महत्त्वाची आहे?
ब्रॅकीथेरपी ही गर्भाशय मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि इतर काही कर्करोगांच्या उपचारांसाठी अत्यंत प्रभावी पद्धत मानली जाते. या उपचारात थेट कर्करोगाच्या जागी किरणोत्सर्ग दिला जातो, त्यामुळे आजूबाजूच्या निरोगी पेशींवर कमी परिणाम होतो. यामुळे उपचार अधिक अचूक होतात आणि रुग्णांना पारंपरिक उपचारांच्या तुलनेत कमी त्रास सहन करावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com